गणेश अन् कविता विवाहबद्ध, यशवंत मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी
डांगसौंदाणे : प्रतिनिधी
येथील जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायणाच्या सांगता सोहळ्याच्या दिवशी तुकाराम सोनवणे यांचा मुलगा गणेश आणि दीपक बोरसे (रा. अहमदाबाद) यांची कन्या कविता यांचा शुभविवाह पारायण मंडपात पार पडला. यशवंत बहुउद्देशीय धर्मसंस्कार मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत या अनोख्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.
गणेश यांचे डांगसौंदाणे येथील आठवडे बाजारात गणाजी चिवडा नावाचे भेळ-भत्त्याचे दुकान आहे. कविता आपल्या आजीसोबत बाजारात शेंगा विकायला येत असल्याने शेजारीच असलेल्या गणेश यांच्याशी तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. 11 जून रोजी गणेश यांनी कविताच्या कुटुंबीयांना घरी आमरसाच्या जेवणासाठी बोलावले असता, तिथे लग्नाचे निश्चित झाले.
नातेवाइकांनी तातडीने विवाह करण्याचा आग्रह धरला.
गावात गाथा पारायणाचा सांगता सोहळा आणि मिरवणूक सुरू होती. गणेश हा पारायणातील भाविकांना रोज फराळ तयार करून देत असे. त्यामुळे ग्रामस्थांनी सोनवणे परिवाराला थेट पारायण मंडपातच लग्न लावण्याचा सल्ला दिला.
दोन्ही बाजूंनी संमती दर्शवताच गावकर्यांनी पुढाकार घेऊन तातडीने हळद, कपडे आणि दागदागिन्यांची सोय केली.
मिरवणुकीनंतर नामदेव महाराज, दिलीप पाठक व अविनाश जोशी यांनी मंगलाष्टके म्हणून हा विवाह लावला. मिरवणुकीतील सर्व भाविकच या लग्नाचे वर्हाडी बनले. एकादशी असल्याने वर्हाडींना साबूदाणा खिचडीचा फराळ देण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याला यशवंत मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे, निवृत्ती सोनवणे, उज्ज्वल बोरसे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
A unique wedding ceremony in the Gatha Parayan pavilion.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…