नाशिक

सिन्नरला शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके

मोफत पुस्तक वितरणासाठी शिक्षण विभाग सज्ज; 99 टक्के संचांचा पुरवठा पूर्ण, उर्वरित पुस्तके दोन दिवसांत उपलब्ध होणार

सिन्नर : प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मोफत पाठ्यपुस्तक वितरणाची तयारी पूर्ण केली आहे. तालुक्यातील 34 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचा लाभ मिळणार आहे. आवश्यक पाठ्यपुस्तकांपैकी 99 टक्के साठा शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाला आहे. उर्वरित काही पुस्तकांचाही पुरवठा पुढील दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याने विद्यार्थ्यांना संपूर्ण संच वेळेत मिळणार आहे.
सिन्नर तालुक्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील एकूण 34,165 विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचे नियोजन करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून आवश्यक पुस्तकांचा बहुतांश पुरवठा प्राप्त झाला असून, केवळ 92 पुस्तकांची तूट शिल्लक आहे.
इयत्ता पहिली व दुसरीच्या प्रत्येकी 3,659 विद्यार्थ्यांसाठी सर्व मुख्य विषयांची पुस्तके उपलब्ध झाली आहेत. तसेच इंग्रजी विषयाच्या काही प्रती अतिरिक्त प्राप्त झाल्या आहेत. इयत्ता तिसरीतील 3,848 विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीच्या काही प्रतींची किरकोळ तूट असली, तरी इतर सर्व विषयांचा पुरवठा पूर्ण झाला आहे. चौथी, पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले संपूर्ण संच शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.
उच्च प्राथमिक स्तरावर इयत्ता सातवी व आठवीच्या काही विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या मर्यादित प्रती अद्याप प्राप्त व्हायच्या आहेत. तसेच आठवीच्या हिंदी सुगम भारती विषयातही काही पुस्तकांची कमतरता आहे. मात्र, मराठी माध्यमातील ‘बालभारती’ आणि ‘गणित’ या मुख्य विषयांच्या पुस्तकांचा पुरवठा शंभर टक्के पूर्ण झाला आहे.
तालुक्याला आवश्यक असलेल्या एकूण पुस्तकांपैकी 34,073 हून अधिक पुस्तके वेळेत प्राप्त झाल्याने यंदा विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक संच देण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.

In Sinnar, 34,000 students received their textbooks on the very first day of school.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

9 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

9 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

9 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

9 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

10 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

10 hours ago