नाशिक

बिबट्याच्या भीतीने पळाला; खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू

नळवाडी-चिकणी रस्त्यावरील घटना

सिन्नर : प्रतिनिधी
नळवाडी-चिकणी रस्त्यावर बिबट्या दिसल्याने घाबरून पळणार्‍या तरुणाचा खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अमोल दामोदर आंधळे (वय 35, रा. प्रतापपूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव असून, दोन दिवस उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
याबाबत दादापाटील सखाराम शेळके (रा. नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर) यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल आंधळे हे 9 मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास नळवाडी येथून चिकणी गावाकडे पायी जात होते. त्यावेळी रस्त्यालगत त्यांना बिबट्या दिसल्याने ते घाबरून पळू लागले. पळत असताना मंदिराजवळील खोल खड्ड्यात ते पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.
जखमी अवस्थेत त्यांना प्रथम संगमनेर येथील डॉ. वर्पे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पीएमटी हॉस्पिटल, लोणी येथे हलविण्यात आले. पुढे एसएमबीटी हॉस्पिटल, घोटी-धारणगाव येथे उपचार सुरू असताना 11 मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नळवाडी-चिकणी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

A young man died after falling into a pit after running away from a leopard

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago