नाशिक

अखेर भगूर नगरपरिषदेकडून टाकलेला कचरा साफ

24 तासांत प्रशासनाची कारवाई

गांवकरी इम्पॅक्ट

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
भगूर शहरातील आठवडे बाजार परिसरालगत टाकण्यात आलेल्या घनकचर्‍यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील नवीन वसाहत, राजवाडा, दलित वस्ती परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. दुर्गंधी, डास-मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव, तसेच श्वसनाच्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा भगूर नगरपरिषदेकडे निवेदने देऊन हा कचरा अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगरपरिषदेने संबंधित कचरा उचलून नवीन वसाहत परिसरालगतच्या नाल्यात व खड्ड्यात टाकल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली होती. परिसरातील महिला व नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, लहान मुले नाल्याजवळ खेळत असल्याने मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. डास व दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे सांगितले. यासंदर्भात स्थानिक नागरिक भास्कर साळवे यांनी नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत परिसरातील परिस्थितीकडे लक्ष वेधले. याबाबतचे वृत्त दै. ’गांवकरी’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नगराध्यक्षा, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकार्‍यांना नाल्यात पाइप टाकून ड्रेनेजचे पाणी पुढे सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेसीबीने प्रत्यक्ष साफसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली.

Finally, the garbage dumped by Bhagur Municipal Council is cleaned up.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago