आस्वाद

स्वप्न बघणारा तरुण…

आजचा युवा भारताला बलशाली बनवत आहे. युवांच्या कार्यावरच भारताचे उज्वल भविष्य अवलंबून आहे. त्यावर आधारित भारत माता हळूहळू आपले नेत्र उघडीत आहे. असे गौरवांकित उद्गार स्वामी विवेकानंद यांनी भारतीय युवांसाठी काढले आहेत.
एका बाजूला युवा बिघडत आहे. बेरोजगार आहे. ते व्यसनाधीन आहेत. त्यामुळे देशाचं भवितव्य धोक्यात आहे.अशी युवांची बदनामी केली जात आहे. अशा तरुणांनी स्वतःसाठीच काही केले नाही, तर ते देशासाठी काय करणार? असे प्रश्नचिन्ह काही तरुणांबद्दल समाजापुढे उभे राहते.
ही एक बाजू सत्य असली, तरी ती पूर्णतः सत्य नसून काही प्रमाणात याची शक्यता जाणवते. परंतु दुसर्‍या बाजूला मोठे स्वप्न बघणारे तरुण सामर्थ्यवान आहेत. बलशाली आहेत. नवीन स्वप्न बघणारी आहेत. त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या स्वप्नांचा ते पाठलाग करणारे आहेत. परिस्थिती पुढे हतबल न होता आलेल्या आव्हानांना पेलणारे व स्वीकारणारे आहेत. या पिढीला नवनवीन आव्हाने स्वीकारायला आवडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या
स्पर्धेच्या युगात ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घेऊन जिद्द व चिकाटीने ध्येय समोर ठेवून स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते तत्पर असतात. आधुनिक जगाच्या नवनवीन ज्ञानाचा व अनुभवाचा खजिना त्यांच्याजवळ आहे. आपल्या देशाच्या सीमेवर देशाचे व देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी आजच्या तरुणाचे मोठ्या प्रमाणात बलिदान आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून हेही एक स्वप्न आजच्या तरुणाचे आहे.
या युवांना स्पर्धेच्या युगात
स्वतःला टिकवण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच कौटुंबिक, सामाजिक जबाबदार्‍या याही त्याच्यापुढे उभ्या असतात. भारतीय नागरिक म्हणून जबाबदारी पार पाडण्यात तो सज्ज असतो.
रोजगारीच्या शोधात अनेक स्पर्धांच्या युगात अपयश आल्यावर तो कधी स्थिती पुढे हतबल होतो. प्रयत्न करूनही त्याला यश प्राप्त होत नसेल. तर मानसिक विवंचनेतून त्याला जावे लागते. अशा तरुणास कुटुंबीयांनी, समाजाने धीर द्यावा आधार द्यावा त्याचे मनोबल खच्चीकरण होणार नाही यासाठी त्याच्यासोबत ठामपणे उभे राहायला हवे.
त्याने बघितलेल्या स्वप्नांचा उपहास न करता. त्याने त्याचे स्वप्न कृतीत उतरवावे यासाठी त्याला थोडा वेळ व आधार द्यावा. तो जर त्याला मिळाला तर नक्कीच त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठबळ मिळू शकते. म्हणून आजचा तरुण हा नवीन स्वप्न बघणारा आहे. उंच भरारी घेणारा आहे. या तरुणांचा मार्ग कितीही कठीण असला तरी संयम बाळगून त्याला शक्ती प्रदान करण्यासाठी प्रयत्न हवेत. यश मिळेपर्यंत त्याला धीर मिळावा. त्याचे स्वतःचे मार्ग त्याला निवडण्यास स्वातंत्र्य मिळावे. कुटुंब व समाजाने परिस्थिती समजून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर नक्कीच आजचा स्वप्न बघणारा तरुण हा त्याने बघितलेल्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतो…

A young man who dreams…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago