अंघोळीस गेलेल्या तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

महालपाटणे परिसरात शोककळा

देवळा : प्रतिनिधी
तालुक्यातील महालपाटणे येथे गिरणा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 14) दुपारी घडली. देवळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सुरू आहे. गुरुवारी (दि. 14) दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्पेश रवींद्र भंडोरे (वय 19) हा मित्रांसोबत क्रिकेट खेळून झाल्यानंतर गिरणा नदीपात्रात अंघोळीसाठी उतरला होता, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली. सदर तरुणाचा शोध घेण्यासाठी मालेगाव येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने अथक प्रयत्नानंतर कल्पेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे महालपाटणे परिसरात शोककळा पसरली आह. देवळा ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले, त्यानंतर रात्री आठला शोकाकुल वातावरणात कल्पेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे तपास करीत आहेत.

A young man who went to bathe drowned in the Girna riverbed and died.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *