विडी कामगार नगर मध्ये युवकाचा खून
पंचवटी : वार्ताहर
आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विडी कामगार नगर
मध्ये रविवार ता.२४ रोजी रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या सुमारास एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. विशांत भोये (वय २९ रा. विडी कामगार शाळे पाठीमागे, अमृतधाम)असे मयताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विशांत भोये हा आपल्या कुटूंबा समवेत अमृतधाम विडी कामगार नगर येथे वास्तव्यास आहे. रविवार ता.२४ रोजी रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या सुमारास विडी कामगार नगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ तो आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारत उभा होता. यावेळी त्याठिकाणी अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी विशांत व त्याच्या समवेत उभ्या असलेल्या मित्रांच्या डोळ्यात प्रथम मिरची पूड फेकली. त्यानंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने विशांत वर हल्ला केला .यातील एका संशयिताने विशांत थेट कोयत्याने छातीवर वार केला. यावेळी विशांत जमिनीवर धारातीर्थ पडला. विशांतला त्याच्या मित्रांनी लागलीच उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या छातीवर
वर्मी घाव लागल्याने डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून किरकोळ वाद झाला होता, त्यातून खून झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
खुनाच्या घटनेनंतर अमृतधाम कामगार परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.या भागात काही काळ पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मयत विशांत भोये याच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालया बाहेर प्रथम मारेकऱ्यांना जेरबंद करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी केली .
कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा…
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…