शिरवाडे फाटा येथे स्विफ्ट कार मोटारसायकल अपघातात एक युवक ठार
लासलगाव प्रतिनिधी
भरवस फाटा ते शिर्डी राज्य मार्गावर रात्री १२.३० च्या दरम्यान शिरवाडे फाटा येथे स्विफ्ट कार व मोटारसायकल अपघातात एक युवक ठार तर एक जबर जखमी झाला.
सविस्तर माहिती अशी की, रात्री १२.३० वाजेच्या दरम्यान आश्वी उंबरी ता.संगमनेर येथील मारुती स्विफ्ट कार एम.एच २० सी.एस ०२०२ ही सोनेवाडी बु.येथे दर्शन घेऊन भरवस फाट्याकडून कोळपेवाडीकडे जात असतांना बजाज अव्हेंजर एम.एच १५ एफ.आर १९०६ या मोटारसायकल व स्विफ्टची जोरदार धडक झाली.
या अपघातात मोटारसायकल वरील दिपक सुधाकर टोपे वय ३५ रा.पिंपळद ता.चांदवड याचा पाय तुटून जोरदार रक्तश्राव झाल्याने उपचारासाठी नेत असतांना दिपकचा मृत्यू झाला.रोहित नामदेव लामखडे वय २५ रा.दरसवाडी ता.चांदवड हा जबर जखमी झाला असून नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.पो.पा.रामनाथ तनपुरे यांनी घटनेची माहिती लासलगाव पोलीस ठाण्यात कळवली. स.पो.नि भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.संदीप शिंदे, औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.
—-
तर युवकाचा जीव वाचला असता
या अपघातात दीपक याचा पाय तुटून रक्तश्राव होत होता. याप्रसंगी उपस्थितांनी १०८ सह परिसरातील सर्वच रुग्णवाहिकांना फोन करूनही तब्बल दीड तास एकही रुग्णवाहिका आली नाही त्यामुळे उपचाराभावी पायातून जोरदार रक्तश्राव होऊन दिपकचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik