नाशिक दिंडोरी रोडवर भीषण अपघातात 5 ठार
दिंडोरी : प्रतिनिधी
नाशिक – दिंडोरी या रस्त्यावरील आरोग्य विज्ञानविद्यापीठाजवळील सचिन पेट्रोलपंपाजवळ बोलेरो वाहनावरील चालकाचा ताबा सुटून समोर असलेल्या मोटारसायकलवर धडक देवून झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक – दिंडोरी रस्त्यावरील आरोग्य विज्ञानविद्यापीठाजवळील सचिन पेट्रोलपंपासमोर बोलेरा वाहन क्रमांक (एमएच 15 जीआर 4105) ही बोलेरा वाहन भरधाव वेगाने जात असतांना ओव्हरटेक करतांना समोरील येणार्या वाहनाचा अंदाज न आल्याने समोरुन जात असलेल्या मोटारसायकल क्रमांक ( एमएच 15 एचएल 3156) या मोटारसायकला धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात बोलेरो वाहनातील तिन जण तर मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बोलेरो वाहनातील मुकेश कुमार यादव (25), अमन रामकिसन यादव (18),कुसूमदेवी रामकिसन यादव (45) सर्व रा. ड्रिम कॅसल, नाशिक, (मुळ रा. बनारस, युपी),
तर मोटारसायकलवरील अनिल चिमाजी बोडके आणि राहुल अनिल बोडके )रा. शिंप्पी टाकी, ता. निफाड, जि. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बोलेरो वाहनातील अब्बल रामकिसन यादव (20), विकास कपिलदेव यादव (39), रामकिसन श्रीनाथ यादव (50) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना दिंडोरी पोलिस ठाण्याला समजताच पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दिंडोरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…