हापूस आंब्याची लासलगावमार्गे परदेशवारी

हापूस आंब्याची लासलगाव मार्गे परदेशवारी

लासलगाव:-समीर पठाण

लासलगाव येथे भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिलपासून आंबा निर्यातीला सुरुवात झाली असून ७५०० बॉक्समधून २८ टन आंबा हा अमेरिकेला निर्यात झाल्याची माहिती लासलगाव कृषकचे अधिकारी संजय आहेर यांनी ‘दै.गावकरी’शी बोलताना दिली.

भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते.भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते.जगभरातील खवय्यांना भुरळ घालणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगावमार्गे झाली असून २८ टन आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहे.मागील वर्षी एकट्या अमेरिकेत एक हजार टन आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव येथील कृषकमधून झाली होती.गेल्या १५ वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंबा मोठ्या झपाट्याने अमेरिका,ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया दिशेने कूच करू लागला आहे.

लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून अल्फान्सो,केशर,बदाम,राजापूर,मल्लिका,हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.लासलगाव येथे ३१ ऑक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता.मात्र,येथे आता कांद्याबरोबर मसाले व आंब्यावर सुध्दा येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे.अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस,केशर, दशरा,बेंगणपल्ली,लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे

विकिरण प्रक्रिया म्हणजे?

लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते.यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच,शिवाय कोयीतील कीड नष्ट होते.आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रियाही थांबते.कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

 

आंब्याची २००७ पासूनची निर्यात

सन:-निर्यात (टन)

२००७:-१५७
२००८:-२७५
२००९:-१२१
२०१०:-९६
२०११:-८५
२०१२:-२१०
२०१३:-२८१
२०१४:-२७५
२०१५:-३२८
२०१६:-५६०
२०१७:-६००
२०१८:-५८०
२०१९:-६८५
२०२२:-३५०
२०२३:-१०२३

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago