विंचूर-येवला रस्त्यावर अपघात; एकाचा मृत्यू

ट्रक- छोटा हत्ती वाहनांची समोरासमोर धडक

विंचूर : प्रतिनिधी
विंचूर-येवला रस्त्यावरील एरिकेशन्स कॉलनीसमोर गुरुवारी (30 जुलै) दुपारी 2 वाजेच्या सुमारास ट्रक आणि टाटा एसीई (छोटा हत्ती) वाहनात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.
या अपघातात ज्ञानेश्वर शिंदे (वय 58, रा. वाकद, ता. निफाड) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले शेतकरी शरद गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी शरद गायकवाड हे कांदे विक्रीसाठी ज्ञानेश्वर शिंदे यांच्या वाहनातून (एमएच 43 बीबी 0310) विंचूर उपबाजार समितीत येत होते. एरिकेशन्स कॉलनीसमोर विंचूरकडून येवल्याकडे जाणार्‍या भरधाव ट्रकने (सीजी 29 एजी 5473) त्यांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की टाटा एसीई वाहन रस्त्यावर पलटी झाले आणि चालक ज्ञानेश्वर शिंदे वाहनाखाली दबले गेले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने बाहेर काढले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Accident on Vinchur-Yeola Road; one dead.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *