समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात नाशिकचे 12 जण ठार

नाशिक: प्रतिनिधी

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून आज पहाटे  टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात होऊन 12 जण ठार झाले, तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत, मृत सर्व नाशिक शहरातील भाविक आहेत, प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका ट्रकला अडवल्याने ट्रक च्या मागे असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकला जाऊन धडकल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे, अपघात झाल्यानंतर पोलीस यंत्रणा दाखल झाली, तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, दरम्यान या अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले,

या अपघातात

मृतांची नावे

1) तुनुश्री लखन सोळसे वय पाच वर्षे राहणार समता नगर नाशिक
2) संगीता विलास अस्वले 40 वर्षे राहणार वन सगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक

3) पंजाबी रमेश जगझाप 38 वर्ष राहणार राजु नगर नाशिक

4) रतन जमदाडे वय 45 वर्ष राहणार संत कबीर नगर वैजापूर

5) काजल लखन सोळसे वय 32 वर्ष राहणार समता नगर नाशिक

6) रजनी गौतम तपासे वय 32 वर्षे राहणार गवळणी नाशिक

7) हौसाबाई आनंदा शिरसाट वय 70 राहणार उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक

8) झुंबर काशिनाथ गांगुर्डे वय 58 राहणार राजु नगर नाशिक

9) अमोल झुंबर गांगुर्डे वय 18 वर्षे राजु नगर नाशिक

10) सारिका झुंबर गांगुर्डे वय 40 वर्ष राजु नगर नाशिक

11) मिलिंद हिरामण पगारे वय 50 वर्ष कोकणगाव ओझर तालुका निफाड जिल्हा नाशिक

12) दीपक प्रभाकर केकाने वय 47 िंपळगाव बसवंत नाशिक हे मृत झाले आहेत,

 

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago