नाशिक

जिल्हा परिषदेत नवीन रचनेनुसार 74 गट, 148 गण

2017 च्या गट व गण रचनेप्रमाणे 2025 ची निवडणूक होणार

नाशिक : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जिल्हा परिषद गट व गणांची नव्याने पुनर्रचना करण्याचे आदेश देण्यात आले असून, जिल्ह्यात आता 74 जिल्हा परिषद गट, तर 148 पंचायत समिती गण राहणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 38 सदस्य संख्या आवश्यक राहणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी प्राथमिक तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे प्रारूप गट व गणरचनेचा आराखडा मागविला आहे. सद्यस्थितीत तालुका पातळीवर हे काम प्राथमिक टप्प्यावर सुरू झाले आहे. यामुळे आता इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, याबाबतच्या आदेशाकडे आता लक्ष लागले असून, एक-दोन दिवसांत आदेश येईल, असे सांगण्यात आले.
नवीन आराखड्यानुसार जिल्हा परिषदेचे एकूण गट 74 होणार आहेत. निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत व ओझरला नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यामुळे दोन गट कमी होणार आहेत. चांदवड, मालेगाव आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढणार आहेत, तर गण 148 होणार असून, गट व गणांपैकी काहींची पुनर्रचना होऊन आरक्षणही नव्याने काढण्यात येणार आहे.
2017 च्या गट व गण रचनेप्रमाणे 2025 मध्ये होणारी निवडणूक होणार आहे. चांदवड, सुरगाणा व मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एक गट व दोन दोन गण नव्याने निर्माण होणार आहेत. गट व गणाची रचना ही 2022 मध्ये ज्याप्रमाणे होती, त्याप्रमाणेच राहणार आहे. गट व गणाची पुनर्रचना करण्यास सांगितले असून, यामध्ये थोडाफार एखाद दुसर्‍या गावाचा बदल होऊ शकतो. ही गटरचना झाल्यानंतर त्यावर हरकती मागवल्या जातील. त्यानंतर आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
2022 मध्ये जसे आरक्षण निघाले होते तसेच किंबहुना त्यात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे इच्च्छुकांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली असून, सर्वच पक्षांनी गणिते जुळविण्यास सुरुवात केली आहे.

2017 मधील तालुकानिहाय गट

बागलाण –     7
कळवण –      4
दिंडोरी –        6
नाशिक –       4
इगतपुरी –     5
मालेगाव –     7
देवळा –         3
सुरगाणा –     3
पेठ –             2
चांदवड –       4
येवला –         5
सिन्नर –       6
निफाड –       10
त्र्यंबकेश्वर – 3
नांदगाव –     4

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

21 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

21 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

21 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

21 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

21 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

21 hours ago