नाशिक

फडणवीस- राज ठाकरे भेटीने नव्या समीकरणांची चर्चा

मुंबई : उद्धव सेना ही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या काही दिवस येत होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईत ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. दोघांनी बंद दाराआड तासभर चर्चा केली. चर्चेविषयी सविस्तर माहिती देणे दोन्ही नेत्यांनी चतुराईने टाळले. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री आणि राज यांच्यातील चर्चेमुळे उद्धव सेना आणि मनसे यांची संभाव्य युती होण्याआधीच तुटल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वांद्य्रातील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये सकाळीच मनसे प्रमुख राज ठाकरे पोहोचले. थोड्या वेळाने तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोघांनी बंद दाराआड तासभर चर्चा केली. याआधी मागील दोन महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव सेना ही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करणार असल्याची चर्चा होत होती. दोन्ही पक्षांमध्ये युतीला पूरक अशी चर्चा झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर गुरुवार, 12 जून रोजी सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालेल्या चर्चेअंती उद्धव सेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चेचा दी एंड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीतून महायुतीसाठी काही चांगलं होणार असेल तर या भेटीचे आम्ही स्वागत करतो, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय चतुराईची कल्पना सार्‍यांना आहे आणि राज ठाकरे हे स्वतंत्र राजकीय विचारांचे आहेत. यामुळे काय चर्चा झाली किंवा काय ठरलं याचे अंदाज करण्यापेक्षा त्यांच्याकडून अधिकृतपणे काय सांगितलं जातं आणि कधी सांगितलं जातं याची वाट बघणेच योग्य होईल, असेही उद्योगमंत्री उदय सामंत
म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर या दोघांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे पुन्हा एकदा मनसे महायुतीत प्रवेश करणार का? या चर्चेला उधाण आले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

20 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

20 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

20 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

20 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

20 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

20 hours ago