गुन्हे शाखा युनिट-2 ची यशस्वी कारवाई
देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांना मारहाण करून सोन्याची चेन आणि रोकड जबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी प्रेम ऊर्फ साई मोनू राणा (वय 19, रा. महालक्ष्मी मंदिराजवळ, लॅमरोड, देवळाली कॅम्प) याला नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-2ने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 12.20 वाजता फिर्यादी आणि त्यांचे मित्र डॉमिनोज पिझ्झाच्या ऑर्डरचे काम आटोपून देवळाली कॅम्प परिसरात उभे होते. त्यावेळी प्रेम ऊर्फ साई राणा आणि त्याच्या साथीदाराने जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ व मारहाण करून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि पॅन्टच्या खिशातील रोकड जबरीने हिसकावून घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
याप्रकरणी फिर्यादीने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-2चे पथक प्रयत्नशील होते.
दरम्यान, प्रेम ऊर्फ साई राणा हा लॅमरोड, देवळाली कॅम्प परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी खातरजमा करून कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने जुन्या भांडणातून वाद झाल्यानंतर मारहाण करून जबरी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-2चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, हेमंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, प्रकाश महाजन आणि पोलीस अंमलदार मनोज शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
Accused arrested in Deolali Camp robbery case.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…