नाशिक

ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी 40 चालकांना शिक्षा; नाशिकमध्ये कारवाई तीव्र

आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम

पंचवटी : प्रतिनिधी
मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक आणि शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या वाहतूक शाखेतर्फे दर शनिवार व रविवारी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, आतापर्यंत न्यायालयात दोष सिद्ध झालेल्या 40 चालकांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये 10 हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा समाविष्ट आहे.
मद्यपान करून वाहन चालविणे हे स्वतःच्या तसेच रस्त्यावरील अन्य नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी मद्यप्राशन केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये दोष सिद्ध होण्याचे प्रमाण वाढत असल्याने न्यायालयाकडूनही अशा प्रकरणांमध्ये कठोर दंडात्मक कारवाई केली जात आहे. न्यायालयीन कारवाईचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोधले यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोटार वाहन निरीक्षक अभिजित वाघमारे, मनीष देवरे, उमेश बेडसे आणि श्रीकांत मंडलिक यांच्यासह शहरातील विविध वाहतूक विभागांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले आहेत. या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये खळबळ
उडाली आहे.

मद्यपान करून वाहन चालवल्यास कारवाई

वाहनचालकांनी नियमांचे पालन करून स्वतःचे आणि इतरांचे प्राण सुरक्षित ठेवावेत. मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी.
– प्रदीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

 

40 drivers penalized in drunk driving cases; crackdown intensifies in Nashik.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

11 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

11 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

11 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

11 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago