एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
सिडको : विशेष प्रतिनिधी
एमआयडीसी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील आयमा हाऊसजवळील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणार्या चोरट्यास पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीतील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन फोडल्याची वरिष्ठ बँक मॅनेजर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एमटीएम मशीन फोडणार्या संशयित अरोपीची गोपनीय माहिती एमआयडीसी चुंचाळे पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार महेश सावळे व मच्छिंद्र दिवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. या प्रकरणातील अरोपी पोलिसांना चकमा देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर घटनेनंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, पोलीस शिपाई किरण सोनवणे यांच्या खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे आणि त्यांच्या टीमने आरोपी नितीन रामलाल पवार (29, रा. जाधव संकुल, अंबड) याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यानंतर आपणच एटीएम मशीन फोडल्याची कबुली दिली. याप्रकरणी संशयितास अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त, नाशिक संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस हवालदार संदीप साळवे, समाधान चव्हाण, जनार्दन ढाकणे, जितेश शिंदे, योगेश्वर जाधव, श्रीहरी बिराजदार, श्रीकांत सूर्यवंशी, विश्वास साळुंखे, आवेज शेख, संदीप खैरनार, अर्जुन कांदळकर, विजय सोनवणे आदींनी केली.
दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…
शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…
फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला शहापूर : साजिद शेख एका…
अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…