हलगर्जी करणारे अधिकारीही रडारवर; प्राधिकरण व मनपाची कठोर भूमिका
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. निर्धारित मुदतीत कामे पूर्ण न करणार्या तसेच गुणवत्तेबाबत त्रुटी आढळलेल्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, कामांच्या देखरेखीत हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांनाही नोटिसा बजावण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत कुंभमेळ्याशी संबंधित विविध रस्ते प्रकल्प, रस्ते पुनर्स्थापना, भूमिगत सेवा वाहिन्यांची कामे आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. काही कामांची प्रगती समाधानकारक नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आवश्यक संसाधनांमध्ये तातडीने वाढ करावी, असे निर्देश देण्यात आले. वेळापत्रक, गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या निकषांचे पालन न केल्यास संबंधित कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत अलीकडील प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या अपूर्ण कामांवर, दर्जासंदर्भातील त्रुटींवर आणि सुरक्षा उपाययोजनांतील कमतरतांवरही चर्चा करण्यात आली. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि प्रकल्पांचा दर्जा कायम राहील, यासाठी सर्व विभागांनी अधिक समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रशासनाने यावेळी केवळ कंत्राटदारांनाच जबाबदार धरण्याऐवजी संबंधित कामांच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधिकार्यांनाही उत्तरदायी धरण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित अभियंत्यांनी नियमित स्थळ पाहणी करून कामांच्या प्रगतीवर लक्ष ठेवावे. नियंत्रण आणि समन्वयात त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकार्यांवरही प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी सुरू असलेली पायाभूत सुविधा कामे नाशिकच्या भविष्यातील विकासासाठीही महत्त्वाची आहेत. त्यामुळे गुणवत्ता आणि वेळ या दोन्ही बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत.
मनपा आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या, रस्ते आणि मान्सूनपूर्व कामांबाबत महानगरपालिकेने शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. वेळापत्रक आणि गुणवत्तेचे निकष न पाळणार्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर देखरेखीत कसूर करणार्या अधिकार्यांची जबाबदारीही निश्चित केली जाईल.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली सर्व पायाभूत सुविधा कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
♦ कामांमध्ये विलंब करणार्या कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस
♦ गुणवत्तेतील त्रुटींवर दंडात्मक कारवाई
♦ मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढविण्याचे निर्देश
♦ सुरक्षा निकषांचे काटेकोर पालन बंधनकारक
♦ कामांच्या देखरेखीत कसूर करणार्या अधिकार्यांवरही कारवाई
बैठकीतील प्रमुख मुद्दे
♦ रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा
♦ रस्ते पुनर्स्थापना कामांची प्रगती
♦ भूमिगत सेवा वाहिन्यांच्या कामांचे परीक्षण
♦ मान्सूनपूर्व तयारीची समीक्षा
♦ नागरिकांना कमीत कमी त्रास होण्यासाठी समन्वयावर भर
♦ सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
Action against contractors who delay work
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…