नाशिक

गजपुष्प कॉलनीतील नागरी सुविधांचा बोजवारा

कमी दाबाने पाणी, नालेसफाईचा अभाव; नागरिक त्रस्त

सिडको : प्रतिनिधी
नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक 28 अंतर्गत येणार्‍या गजपुष्प कॉलनी परिसरातील मूलभूत नागरी सुविधा कोलमडल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
रस्त्यांची बिकट अवस्था, नाल्यांमध्ये साचलेला कचरा, अपुरी नालेसफाई, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गतिरोधकांची प्रलंबित मागणी यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शहरात गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले होते. गजपुष्प कॉलनी परिसरातील रस्त्यांचाही यात समावेश होता. मात्र, पाइपलाइनचे काम पूर्ण होऊन बराच कालावधी उलटूनही संबंधित रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यात आलेले नाही. परिणामी, रस्ते खड्डेमय झाले असून, नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील पावसाळ्यात चिखल आणि पाणी साचल्यामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यंदाही पावसाळा सुरू असताना प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. परिसरातील इतर भागांत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे झालेली असताना गजपुष्प कॉलनी मात्र विकासकामांपासून वंचित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

नाल्यालगत कचर्‍याचा अड्डा

गजपुष्प कॉलनीजवळील मोठा नाला आणि त्याच्या बाजूची मोकळी जागा सध्या कचरा टाकण्याचे केंद्र बनली आहे. नाल्यात तसेच आसपास मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकला जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. कचर्‍यामुळे नाल्याचा प्रवाह अडथळाग्रस्त होत असून, पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका वाढला आहे.

1 महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे नियोजन जाहीर केले जाते. मात्र, गजपुष्प कॉलनी परिसरात अद्याप प्रभावी सफाई झाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित नाल्याची प्रत्यक्ष स्वच्छता न करता केवळ कागदोपत्री कामे दाखविली जात असल्याचीही चर्चा
परिसरात आहे.

2 बुरकुले हॉलमागील रस्ता तसेच शुभम पार्क परिसरातील मार्गावर वेगवान वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. कामटवाडे आणि अंबड गावाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, अपघात रोखण्यासाठी आवश्यक असलेले गतिरोधक अद्याप बसविण्यात आलेले नाहीत.

3 ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. बँक ऑफ इंडियासमोरील परिसरात यापूर्वी अनेक अपघात घडले असून, एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. शुभम पार्क परिसरातही वारंवार अपघात होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. अनेक वेळा निवेदने देऊन आणि पाठपुरावा करूनही प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Deterioration of civic amenities in Gajpushpa Colony

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

17 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

17 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

17 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

18 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

18 hours ago