तिघे ताब्यात, 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-2 ने अवैधरीत्या देशी दारूची विक्री व साठा करणार्या तिघांविरुद्ध कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत नाशिकरोड येथील बागूलनगर परिसरातून शुभम राजाराम गांगुर्डे (वय 26, रा. विहितगाव, नाशिकरोड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक हजार 920 रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्या कारवाईत सातपूर परिसरातील महिंद्रा कंपनीसमोरील भागातून गौतम सुरेश ठाकरके (वय 28, रा. प्रबुद्धनगर, सातपूर) याच्या ताब्यातून दोन हजार 880 रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
तिसर्या कारवाईत देवळाली कॅम्प परिसरात रेल्वेस्थानकाकडे जाणार्या रस्त्यावरून संजय नथू आडके (वय 52, रा. नाणेेगाव, ता. जि. नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सहा हजार 800 रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही कारवायांत गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींसह जप्त मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
Action against illegal country liquor in Nashik
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…