नाशिक

सात दिवसांत 15.89 लाखांचा अन्नसाठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
ग्राहकांना स्वच्छ, निर्भेळ, दर्जेदार व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नाशिक जिल्ह्यात धडक कारवाई मोहीम राबवली. 28 मे ते 4 जून या सात दिवसांच्या कालावधीत विविध ठिकाणी तपासण्या करून 15 लाख 89 हजार 533 रुपयांचा संशयित व प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, विविध उत्पादने व विक्री केंद्रांवर छापे टाकण्यात आले. माडसांगवी येथील कृष्णा आइस्क्रीममध्ये अनारोग्यकारक परिस्थितीत आइस्क्रीम व फ्रोजन डेझर्टचे उत्पादन सुरू असल्याचे आढळले. तेथून नमुने घेऊन आठ हजारांचा साठा जप्त
करण्यात आला.
कुंदेवाडी (ता. निफाड) येथे महाराष्ट्र चिक्की ही पेढी विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनास आले. तेथून शेंगदाणा चिक्कीचा 15 हजार 200 रुपयांचा साठा जप्त
करण्यात आला.
चांदवड येथील संकेत सुपारी अँड किराणा स्टोअर्स तसेच गिरणारे व सिन्नर येथील व्यापार्‍यांकडे रिफाइंड सोयाबीन तेलाची खुल्या स्वरूपात विक्री होत असल्याचे आढळले. या ठिकाणांहून सुमारे 1.71 लाखांंचा तेलसाठा जप्त करण्यात आला. सिन्नर येथील बिन्नर डेअरीमधून खव्याचे नमुने घेऊन सात हजार 480 रुपयांचा साठा जप्त केला. नाशिकच्या वडाळा परिसरातील न्यू इच्छामणी फूड प्रॉडक्ट्समधून मिक्स फरसाणचा 14 हजार 700 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
पेठ तालुक्यातील अंबिका किराणा व जनरल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या एनर्जी ड्रिंकचे नमुने घेऊन 20 हजार 880 रुपयांचा साठा जप्त
करण्यात आला.
मालेगाव परिसरात दूध वाहतुकीदरम्यान मिक्स मिल्क व म्हशीच्या दुधाचे नमुने घेऊन उर्वरित 58 लिटर साठा नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आला. दरम्यान, राज्यात प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थांविरोधातही मोठी कारवाई करण्यात आली. इगतपुरी, देवळा, पंचवटी आणि मुंबई नाका परिसरात साठवणूक व वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करून लाखोंचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित व्यक्ती आणि उत्पादक व पुरवठादारांविरोधात इगतपुरी, देवळा, पंचवटी आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार आणि सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अन्न सुरक्षा अधिकार्‍यांच्या पथकांनी केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Food stocks worth 15.89 lakh seized in seven days

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago