देवळा : प्रतिनिधी
बहिणीला नांदवत नाही व तिच्या आजारपणासाठी दवाखाना करत नाही, या कारणावरून शालकाने सरस्वतीवाडी (ता. देवळा) येथील मेहुण्यास ठार केल्याची घटना रविवारी
(दि. 10) खालप (ता.देवळा) येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. संशयित आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वतीवाडी येथील प्रकाश रूपेश गांगुर्डे (वय 31) हा आपल्या बहिणीला नांदवत नाही व तिच्या आजारपणासाठी दवाखाना करत नाही, या कारणावरून त्याचा शालक समाधान भावसा पवार (रा. खालप, ता. देवळा) याने रात्री आठ वाजेच्या सुमारास खालप-मेशी रस्त्यावरील सिमेंटच्या पुलावर प्रकाश रूपेश गांगुर्डे मोबाइलवर बोलत असताना पाठीमागून कुर्हाडीने डोक्यावर वार केला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने प्रकाश गांगुर्डेचा जागेवरच मृत्यू झाला. संशयित आरोपी समाधान पवार गुन्हा घडल्यापासून फरार आहे. त्याच्या तपासासाठी देवळा पोलिस व स्थानिक गुन्हेशाखेचे पथक रवाना झाले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलिस उपनिरीक्षक विनय देवरे करत आहेत.
Brutal murder of brother-in-law by throwing an axe at his head
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…