पंचवटी : सुनील बुनगे
राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट अर्थात एचएसआरपी बसविण्याची अंतिम मुदत 30 जून रोजी संपली होती. त्यानंतर नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 1 जुलैपासून एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून, 1 ते 31 जुलैदरम्यान महिनाभरात सुमारे 2 हजार 553 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
राज्य शासनाने एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी पाच वेळा मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही वाहनमालकांकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे अखेर प्रादेशिक परिवहन विभागाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत दिली होती. यापूर्वी वाहनधारकांना नंबरप्लेट बदलण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, तरीही हजारो वाहनधारकांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर 1 जुलैपासून पोलीस आणि परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. ज्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट नसेल, त्यांना केवळ दंडालाच सामोरे जावे लागणार नाही, तर आरटीओशी संबंधित महत्त्वाच्या कामांवरही निर्बंध आणले आहेत. ज्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट नाही, त्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 21 अधिकार्यांची टीम रस्त्यावर उतरली आहे. त्यात प्रादेशिक परिवहन विभागाचे इंटरसेप्टर वाहने, रडार वाहने आणि वायुवेग पथके सहभागी झाले आहेत. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट अर्थात एचएसआरपी सक्तीची असतानादेखील आजही अनेक ‘शोरूममधून’ बाहेर येणार्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवली जात नसल्याचे दिसून येत आहे.
नंबरप्लेटची नवीच फॅशन
अनेक वाहनचालक नवीन वाहन खरेदी केल्यानंतर एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याऐवजी बाहेरून नंबरप्लेट बसवायला पसंती देत असल्याचे दिसून येते. नंबरप्लेट बनविताना नंबरच्या पुढे असलेले अक्षर एकदम लहान अक्षरात लिहिलेले असते. त्यानंतर केवळ वाहनाचा नंबरच वाचण्याइतका दिसतो. याकडे प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक शाखा लक्ष देईल का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
कारवाई सुरूच राहणार
परिवहन विभागाने एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी वेळोवेळी मुदत दिली होती. तरीही अनेक वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले गेले असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे 1 जुलैपासून एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वाहनचालकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसविलेली नसेल, त्यांनी नंबरप्लेट बसवून घेऊन दंडात्मक कारवाई टाळावी. तर यापुढेही एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरूच राहणार आहे.
– प्रदीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिकAction taken against 2,553 vehicles lacking HSRP number plates.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…