नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड व उपनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री कोयत्याने हल्ला, उघडपणे गोळीबार आणि वाहनांची तोडफोड करत दहशत माजवणार्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी नाशिकरोड पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली असून, तपासाची व्याप्ती आता नाशिक जिल्ह्याबाहेरही वाढवण्यात आली आहे.
गुरुवारी मध्यरात्री नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर तसेच उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुवर्ण सोसायटी परिसरात काही हल्लेखोरांनी हातात उघडे कोयते घेऊन नागरिकांवर हल्ला केला. संशयितांनी या भागात गोळीबार करून उघडपणे दहशत निर्माण केली. त्यानंतर परिसरातील अनेक वाहनांची तोडफोड करत ते पसार झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस तपासात या प्रकरणाचे धागेदोरे म्हस्के टोळीपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यामागे नुकताच कारागृहातून सुटलेला एक संशयित तसेच नाशिक जिल्ह्याबाहेरील काही सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत विविध ठिकाणी गुप्त छापेमारी सुरू करण्यात आली आहे. फरार आरोपींना आश्रय देणारे अथवा मदत करणार्यांचाही शोध सुरू असून, संशयितांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांची चौकशी केली जात आहे.
म्हस्के टोळीतील संशयितांसह या गुन्ह्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या एकाही आरोपीला सोडले जाणार नाही. चार विशेष पथके सर्व बाजूंनी तपास करत असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले.
Four special teams to track down the Mhaske gang.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…