महाराष्ट्र

एका हाताने कर्जमाफी, दुसर्‍या हाताने सन्मान निधीला कात्री!

56 लाख शेतकरी ’नमो’ योजनेतून बाद होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीचा मोठा दिलासा दिला असला तरी, आता याच निर्णयामुळे शेतकर्‍यांचा दुसरा आर्थिक लाभ हिरावला जाण्याची शक्यता आहे. वाढत्या आर्थिक बोजामुळे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’चा लाभ घेणार्‍या सुमारे 56 लाख शेतकर्‍यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’तून एका वर्षासाठी वगळण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे.
पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केलेल्या आक्रमक मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला होता. मात्र, या निर्णयामुळे तिजोरीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी आता एका हाताने कर्जमुक्ती देताना दुसर्‍या हाताने हक्काचे सहा हजार रुपये रोखले जाणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 जून 2023 रोजी ‘पीएम किसान’ योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘नमो शेतकरी योजना’ सुरू केली होती. याअंतर्गत पात्र शेतकर्‍यांना वर्षाला तीन हप्त्यांत एकूण सहा हजार रुपयांची रोख मदत दिली जाते. आजवर या योजनेतून राज्यातील 93 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना आठ हप्त्यांमध्ये सुमारे 14,816 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. मात्र, सध्या प्रशासकीय आणि आर्थिक अडचणींमुळे 2026-27 या वर्षातील (डिसेंबर-मार्च आणि एप्रिल-जुलै) दोन हप्ते रखडले आहेत. कृषी आयुक्तालयाने या थकीत निधीच्या वितरणाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असला तरी, कर्जमाफीच्या अतिरिक्त बोजामुळे ’नमो’ योजनेचे भवितव्य तूर्तास तरी टांगणीला लागले आहे.

Loan waivers with one hand, cuts to the honor fund with the other!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago