नाशिक

अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांवर कारवाई

तीन कर्मचारी निलंबित, पीआय भरत जाधव यांची उचलबांगडी

सिन्नर : प्रतिनिधी
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील 14 वर्षीय मुलीच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यास झालेल्या दिरंगाईची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक धोंडोपंत स्वामी यांनी मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत तीन जणांना निलंबित करण्यात आले असून, प्रभारी पोलीस निरीक्षकांचीही तातडीने बदली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी शुक्रवारी (दि.3) विधानसभेत आवाज उठवत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक धोंडोपंत स्वामी यांनी चौकशीचे आदेश देत संबंधित अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित केली.
चौकशीत माळेगाव बीटचे पोलीस कर्मचारी अमोल गुंजाळ व जयेश खाडे तसेच त्या दिवसाचे ठाणे अंमलदार प्रशांत वाघ यांची भूमिका आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. गुन्हा नोंदविण्यात झालेल्या दिरंगाईबाबत त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
याशिवाय, तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक सुनील सुरेश बडगुजर यांनी मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.
या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली असून, कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे मानले जात आहे.

मुख्य आरोपी उत्तर प्रदेशातून ताब्यात

माळेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या मुख्य संशयित आरोपीला मुसळगाव एमआयडीसी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी, पोलीस हवालदार समाधान बोराडे आणि उमेश खालकर यांच्या पथकाने आरोपीचा माग काढत उत्तर प्रदेश गाठले होते. पथकाने मेहताब शमशाद खान याला शोधून काढत
ताब्यात घेतले.

Action taken against police in minor girl’s suicide case.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago