नाशिक

जेलरोड भागात घरांवर दगडफेक करणार्‍या टोळक्याचा बंदोबस्त करा

त्रस्त रहिवाशांची पोलिसांकडे मागणी

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जेलरोड भागातील कॅनॉल रोडवर असलेल्या राजीव गांधीनगर आणि इंगळेनगर परिसरात गेल्या महिनाभरापासून अज्ञात समाजकंटकांकडून घरांवर दगडफेक केली जात आहे. दिवसा आणि रात्रीच्या वेळी अचानक होणार्‍या या दगडफेकीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली असून, या टवाळखोरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी आर्त मागणी त्रस्त रहिवासी करीत आहेत.

महिनाभरापासून दहशत, छोट्या-मोठ्या दगडांचा वापर
राजीव गांधीनगर आणि इंगळेनगर भागातील काही ठराविक घरांना लक्ष्य करून गेल्या महिनाभरापासून अज्ञात टोळक्याकडून दगडफेक केली जात आहे. छोटे-मोठे आणि टोकदार दगडांचा वापर करून घरांच्या पत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. अचानक होणार्‍या या हल्ल्यांंमुळे घरात राहणेही असुरक्षित झाले असून, परिसरातील महिला आणि लहान मुलांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
या समाजकंटकांचा मुख्य उद्देश परिसरात दहशत माजविणे हाच असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
कॅनॉल रोड हा परिसरातील एक मुख्य आणि गजबजलेला रस्ता आहे. या रस्त्यावरून दिवसभर आणि रात्रीच्या वेळीही पादचारी, नोकरदार वर्ग आणि वाहनधारकांची मोठी वर्दळ असते.
तसेच, परिसरातील शालेय विद्यार्थीही याच रस्त्यावरून ये-जा करतात. अशा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी समाजकंटकांकडून बेधडकपणे दगडफेक केली जात असल्याने, एखादा मोठा दगड रस्त्यावरून जाणार्‍या पादचार्‍याला किंवा शालेय विद्यार्थ्याला लागून गंभीर दुखापत होण्याची किंवा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कठोर उपाययोजना करण्याची गरज

या गंभीर प्रकारामुळे स्थानिक नागरिक प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त (पेट्रोलिंग) वाढवावी, संशयितांची धरपकड करावी आणि मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून या टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी राजीव गांधीनगर आणि इंगळेनगरमधील रहिवाशांनी केली आहे. आता पोलीस प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Take action against the gang pelting stones at houses in the Jail Road area.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago