नाशिक

जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्यावर प्रशासनाची धडक

6 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

नाशिक : प्रतिनिधी
प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या साठवणूक व वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी धडक कारवाई करत 6 लाख 65 हजार 241 रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि वाहन जप्त केले. या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) संदीप देवरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (30 जुलै) ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
पहिल्या कारवाईत हरसूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलमान बाबाखान शहा याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यामध्ये 1 लाख 8 हजार 666 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसर्‍या कारवाईत मालेगावातील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत साजिद अख्तर मोहम्मद मुस्तफा अन्सारी याच्याकडून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा व वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत 2 लाख 1 हजार 800 रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि 3 लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले. एकूण 5 लाख 1 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसर्‍या कारवाईत पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत योगेश नंदलाल सोनजे याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत 54 हजार 775 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, नागरिकांनी अन्नपदार्थांचा दर्जा, भेसळ किंवा अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर किंवा 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी स्पष्ट केले.

Administration cracks down on banned gutkha in the district.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago