नाशिक

सातपूर-अंबड लिंकरोडवरील खड्ड्यांवरून शिवसेना आक्रमक

जनआंदोलन करण्याचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
सातपूर-अंबड लिंकरोडवरील वाढत्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांचे हाल होत असून, या प्रश्नावरून शिवसेना (शिंदे) आक्रमक झाली आहे. सातपूर प्रभाग क्रमांक 26 मधील नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला शनिवारपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा अल्टिमेटम दिला असून, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात
आले आहे.
शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे, नयना जाधव, निवृत्ती इंगोले आणि हर्षदा गायकर यांनी दिलेल्या निवेदनात सातपूर-अंबड लिंकरोडवरील रगराव पॉइंट ते एक्स्लो पॉइंट या परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे नमूद केले आहे. या मार्गावर विविध विकासकामे आणि भूमिगत सुविधांची कामे करण्यात आली. मात्र, त्यानंतर रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती न झाल्याने अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे हे खड्डे अधिक खोल आणि धोकादायक बनले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा
लागत आहे.
हा मार्ग सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने दररोज हजारो कामगार, कर्मचारी, व्यावसायिक तसेच मालवाहतूक करणारी अवजड वाहने या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे त्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.
निवेदनात शनिवारपर्यंत सातपूर-अंबड लिंकरोडवरील सर्व धोकादायक खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेनेच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. आंदोलनामुळे निर्माण होणार्‍या कोणत्याही परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी नाशिक महानगरपालिका प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा नगरसेवकांनी दिला आहे.

Shiv Sena aggressive over potholes on Satpur-Ambad link road

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago