नाशिक

नागडे रेल्वे गेट परिसरात कचर्‍यात आढळली ओळखपत्रे

येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील नागडे रेल्वे गेट परिसरातील कचर्‍याच्या ढिगार्‍यात शेकडो ओळखपत्रे बेवारस उघड्यावर पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रस्त्याने पायी जाणार्‍या एका नागरिकाच्या हा प्रकार लक्षात आला. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचर्‍यात शेकडो शासकीय व वैयक्तिक ओळखपत्रे, पॅनकार्ड आणि मतदान कार्ड दिसून आले. याची माहिती मिळताच कामगार तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व ओळखपत्रे येवला शहर पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत. महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे उघड्यावर सापडल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही ओळखपत्रे कोणाची आहेत? ती कचर्‍यात कशी आली? याचा काही गैरवापर झाला आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Administration in ‘action mode’ to control dengue in Malegaon.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

15 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

15 hours ago