प्रशासन अधिकारी प्रमोद नवले आठ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ जाळ्यात

नांदगाव पंचायत समितीला भ्रष्टाचाराची कीड

प्रशासन अधिकारी प्रमोद नवले आठ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ जाळ्यात

मनमाड : आमिन शेख

नांदगाव तालुक्यातील सर्वच प्रशासकीय कार्यलयाला भ्रष्टाचाराची कीड लागली असुन यात पंचायत समिती देखील मागे नाही पंचायत समितीचे  प्रमोद रंगनाथ नवले वय 46 वर्षे, सहायक  प्रशासन अधिकारी रा .महाजन वाडा ,मुक्ताई नगर मालेगाव रोड नांदगाव यांना ८ हजारांची लाच स्विकारताना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की   यातील तक्रारदार यांचे कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी नवले येणार होते ,तरी कार्यालयात तक्रारदार यांची टेबलाची तपासणी व्यवस्थित करून देतो ,म्हणून व चांगले तपासणी करण्याचा अहवाल देतो म्हणून यातील नवले  यांनी तीन हजार रुपये द्या अशी तीन हजार रुपयाची लाचेची मागणी केली . तसेच यातील तक्रारदार यांच्या कार्यालयातील निलंबित झालेला कर्मचारी जमदाडे याची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून मला त्याच्याकडून सुद्धा पैसे आणून द्या ,मी नाशिक येथील कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो असे सांगून एकूण आठ हजार लाच स्वीकारून यातील नवले  हा तक्रादार यांची दप्तर तपासणी चे 3000/- रुपये व जमदाडे यांची चौकशी क्लिअर करण्याचे 5000/- हजार रुपये असे मिळून एकूण 8000/- रुपये घेताना रंगेहात मिळून आला.म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम. 7, व 7 अ अन्वये गुन्हा आहे. नमूद गुन्हा नांदगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे .या कामात शर्मिष्ठा  घारगे पोलीस अधीक्षक नाशिक जिल्हा लाचलुचपत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून एकनाथ गं.पाटील पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, तर सापळा पथक म्हणून पोहवा.सुनील पवार ,पोहवा संदीप वणवे पोहवा . योगेश साळवे सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक युनिट .यांनी काम बघितले.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…

5 minutes ago

प्रकाश लोंढेच्या जामीन अर्जावर 26 मेस सुनावणी

सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…

12 minutes ago

अंबडमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक फेकले, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…

19 minutes ago

सुचितानगरला घरफोडीत 36 लाख लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्‍यांचे…

25 minutes ago

लाच स्वीकारताना एकाच वेळी आठ जण रंगेहाथ ताब्यात

नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…

29 minutes ago

कत्तलीसाठी जाणारे वाहन पकडले

गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…

34 minutes ago