नाशिक

सिन्नर तालुक्यात सोमवारी दुमदुमणार 208 शाळांचा प्रवेशोत्सव

सिन्नर तालुक्यात शिक्षण विभागाची जय्यत तयारी; अधिकारी शंभर शाळांना देणार भेटी

सिन्नर : प्रतिनिधी
उन्हाळी सुट्टीनंतर येत्या सोमवारपासून (दि.15) नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 208 शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचा जल्लोेष पाहायला मिळणार आहे. शाळेची पहिली पायरी चढणार्‍या विद्यार्थ्यांचे स्वागत मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश आणि विविध उपक्रमांद्वारे करण्यात येणार आहे. त्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात संस्मरणीय करण्यासाठी शिक्षण विभागाने व्यापक नियोजन केले आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आकर्षण निर्माण व्हावे आणि प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने विशेष तयारी केली आहे. तालुक्यातील सर्व 208 जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वागत कमानी, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवेशोत्सवाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील वरिष्ठ अधिकार्‍यांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके तालुक्यातील शंभर प्रमुख शाळांना भेट देऊन प्रवेशोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेणार आहेत.
विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तके व गणवेश उपलब्ध झाले आहेत की नाही, याचीही खातरजमा केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या
निर्देशानुसार संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे आनंदी वातावरणात स्वागत करण्यावर भर देण्यात आला आहे. शाळांबरोबरच पालकांनाही प्रवेशोेत्सवाची उत्सुकता लागली आहे. पहिल्या दिवशी जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

प्रवेशोत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न

यंदाचा शाळा प्रवेशोत्सव केवळ शासकीय कार्यक्रम न राहता तो गावाचा उत्सव व्हावा, यासाठी विशेष आवाहन करण्यात आले आहे. गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा प्रवेशोत्सव हा संपूर्ण गावाच्या सहभागातून साजरा होणारा उपक्रम ठरणार आहे.

 

Admission celebrations at 208 schools to resound with enthusiasm on Monday.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

10 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

10 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

10 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

11 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

11 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

11 hours ago