नाशिक

हजारो किलोमीटरचा प्रवास करून नीलपंख सिन्नरमध्ये दाखल!

ठाणगाव-आडवाडीत 10 ते 15 युरोपियन रोलरचा मुक्काम; वनरक्षक संजय गिते यांनी 17 प्रजातींची केली नोंद

सिन्नर : भरत घोटेकर
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव-आडवाडी परिसरात निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरणार्‍या युरोपियन रोलर अर्थात नीलपंख पक्ष्यांचे दर्शन घडले आहे. एकाच वेळी 10 ते 15 नीलपंख पक्षी आढळून आल्याने परिसरातील पक्षीवैविध्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे, हे स्थलांतरित पक्षी गेल्या पंधरा दिवसांपासून या भागात मुक्कामाला असल्याची नोंद सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक संजय लक्ष्मण गिते यांनी केली आहे. वन्यजीव सप्ताहानिमित्त केलेल्या पक्षी निरीक्षणात त्यांनी एकूण 17 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद घेतली.
युरोपियन रोलर हा पक्षी अंगावरील गडद आणि फिकट निळ्या रंगाच्या चमकदार छटांमुळे सहज ओळखता येतो. हवेत झेप घेताना सूर मारणे आणि विविध कसरती करत उडणे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. उडण्याच्या याच वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे त्याला ‘रोलर’ असे नाव पडले आहे. आकर्षक रंगसंगतीमुळे हा पक्षी पक्षीनिरीक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक रवी भोगे, सिन्नरचे वनपरिक्षेत्राधिकारी पूजा रक्ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक संजय गिते यांनी हे पक्षी निरीक्षण नोंदवले. या निरीक्षणामुळे ठाणगाव-आडवाडी परिसरातील पक्षीवैविध्य समोर आले असून, स्थलांतरित पक्ष्यांच्या वावराच्या दृष्टीनेही या भागाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

विविध प्रजातींचे पक्षी

वन्यजीव सप्ताहानिमित्त पक्षी निरीक्षण करताना वनरक्षक संजय गीते यांनी युरोपियन रोलरसह एकूण 17 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद घेतली. यामध्ये खाटीक, सांडोल, सुतार पक्षी, कोकिळा, पांढर्‍या छातीचा खंड्या, टिटवी, सुगरण, ठिपकेवाली मुनिया, पाकोळ्या, बुलबुल, पिंगळा आणि कोतवाल आदी पक्ष्यांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेकडे स्थलांतर

युरोपियन रोलर हा भारतात कायमस्वरूपी वास्तव्य करणारा पक्षी नाही. हा स्थलांतरित पक्षी असून प्रजननानंतर हिवाळा घालवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने प्रवास करतो. या हजारो किलोमीटरच्या प्रवासादरम्यान ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात काही पक्षी भारतात विश्रांतीसाठी थांबतात. याच स्थलांतराच्या कालावधीत ठाणगाव-आडवाडी परिसरात या परदेशी पाहुण्यांचा वावर आढळून आला आहे.

After traveling thousands of kilometers, the ‘Nilpankh’ (blue-winged bird) has arrived in Sinnar!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

8 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

8 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

8 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

8 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

8 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

8 hours ago