नाशिक

औंढेवाडी-धोंडबार रस्त्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर

उदय सांगळे यांचा दावा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा

सिन्नर : प्रतिनिधी
तीन दशकांपासून रखडलेल्या औंढेवाडी-धोंडबार रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा भाजपचे युवा नेते उदय सांगळे यांनी केला आहे. या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधीतून (सीआरएफ) 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांनी बुधवारी (दि.14) पत्रकार परिषदेत दिली. गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यासाठी आंदोलन करणार्‍या आदिवासी बांधवांच्या लढ्याला यामुळे यश आल्याचे सांगळे यांनी
स्पष्ट केले.
हरसुले फाटा, सोनांबे, कोनांबे, धोंडबार, औंढेवाडी ते आगासखिंड या मार्गाची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार मागणी करूनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने संतप्त आदिवासी बांधवांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी आमदार माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर सिन्नर-घोटी महामार्गावर सुमारे चार तास रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. दरम्यान, भाजपचे युवा नेते उदय सांगळे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन औंढेवाडी-धोंडबार परिसरातील ग्रामस्थांच्या समस्यांकडे लक्ष वेधल्याचे सांगितले. आमदार गोकुळ गिते, पालकमंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या शिफारशींसह या रस्त्यासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. या पाठपुराव्यामुळेच रस्त्याच्या कामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा दावा सांगळे यांनी केला. पत्रकार परिषदेला भाजपचे सजन सांगळे, बहिरू दळवी, सुनील माळी, नगरसेवक अनिल सरवार, नगरसेविका आशा कर्पे, युगंधर वाजे, देवा सांगळे, पंचायत समितीचे माजी सदस्य तातू जगताप, रमेश शिंदे, राहुल साबळे, राहुल खेताडे, सागर शिरसाठ, दत्तू भांगरे, विशाल खेताडे आदींसह औंढेवाडी व धोंडबार येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Funds of ₹10 crore sanctioned for the Aundhewadi-Dhondbar road

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

9 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

9 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

9 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

9 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

9 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

9 hours ago