नाशिक

वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी मानधनासाठी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करावेत   :योगेश पाटील

वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी मानधनासाठी

30 जूनपर्यंत अर्ज सादर करावेत

                                                     :योगेश पाटील                          

 नाशिक :

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत  विविध क्षेत्रातील सन्मानार्थी वृद्ध साहित्यिक  व यांना योजनेंतर्गत मानधन अदा केले जाते. जिल्ह्यातील इच्छुक वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी 30 जून 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे अवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.

योजनेच्या लाभासाठी अर्जाचा नमुना पंचायत समितीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.     2023-24 या आर्थिक वर्षात या प्रकरणी निवड समितीची सभा जुलै अथवा ऑगस्ट 2023 मध्ये प्रस्तावित आहे. योजनेच्या लाभासाठी 7 फेब्रुवारी 2014 रोजीच्या शासन निर्णयातील अटीशर्तीनुसार मानधनासाठीचे प्रस्ताव इच्छुकांनी राहत असलेल्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयामार्फत 30 जून 2023 पर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी कळविले आहे

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

19 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

19 hours ago