नाशिक

कृषी विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यातील 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

नाशिक : प्रतिनिधी
खरीप हंगाम-2026 च्या नियोजनांतर्गत शेतकर्‍यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेंंतर्गत त्रुटी आढळलेल्या कृषी सेवा केंद्रांची सुनावणी बुधवारी (दि. 15) परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात पार पडली. या सुनावणीअंती नियमांचे उल्लंघन करणार्‍या जिल्ह्यातील 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांची धडक तपासणी सुरू आहे. बहुतांश घाऊक व किरकोळ खते विक्रेत्यांनी ईपीओएस आयडीवर कंपनीने दिलेली स्वीकृती वेळेत न स्वीकारल्याने त्यांच्या परवान्यावर कारवाई करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान ईपीओएस साठ्यामध्ये अनियमितता असणे, भावफलक व साठाफलक अद्ययावत नसणे, अभिलेखे अद्ययावत न ठेवणे, एन फॉर्ममध्ये साठा रजिस्टर न ठेवणे, शेतकर्‍यांना एम फॉर्ममध्ये देयके न देणे, शेतकर्‍यांची बिलावर स्वाक्षरी न घेणे या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित केंद्रचालकांना नोटीस बजावून बुधवारी प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली. केंद्रचालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक, तसेच कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याने, परवाना अधिकार्‍यांनी 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत.

Agriculture Department takes drastic action

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

19 minutes ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

23 minutes ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

29 minutes ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

36 minutes ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

48 minutes ago

महिला अत्याचारांवर ‘झीरो टॉलरन्स’साठी आज बैठक

नाशिक : प्रतिनिधी शहरात अलीकडे घडलेल्या विविध घटनांमधून महिलांचे लैंगिक शोषण तसेच धर्मांतरणासारख्या प्रकारांचा पर्दाफाश…

60 minutes ago