नाशिक

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत ’यलो अलर्ट’

’आयएमडी’चा पावसाचा इशारा, रविवारपासून हवामानात बदल

नाशिक/पुणे : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून तीव्र ऊन आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करणार्‍या महाराष्ट्राला अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार, 19 एप्रिलपासून राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे.नाशिकसह सहा जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि पुणे यांच्या माहितीनुसार 18 एप्रिलच्या रात्रीपासून हवामानात बदल सुरू होतील आणि 19 ते 21 एप्रिलदरम्यान पावसाचा जोर वाढेल. प्रामुख्याने नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा ’यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल.
काही ठिकाणी पावसासोबतच गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या उन्हाळी पिकांची काढणी आणि फळबागांचे हंगाम सुरू असल्याने शेतकर्‍यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळणार असला, तरी विजा पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पावसाच्या वेळी झाडाखाली किंवा उघड्यावर आसरा घेऊ नये, अशी सूचनाही आयएमडीने दिली आहे.
खान्देश, विदर्भ उष्णतेच्या लाट- भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांत पुढील चार दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात तापमानाचा पारा 42 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उष्माघाताने शेतकर्‍याचा मृत्यू- या वाढत्या उष्णतेचा पहिला बळी सातारा जिल्ह्यात समोर आला आहे. शेतात काम करताना उष्माघाताने एका शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी पिऊन स्वतःची काळजी घ्यावी, तसेच शेतकर्‍यांनी दुपारच्या वेळी काम करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि अरबी समुद्रातील आर्द्रतेमुळे दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. तसेच वातावरणाच्या वरच्या थरात असलेल्या चक्राकार वार्‍यांच्या स्थितीमुळे (सायक्लॉनिक सर्क्युलेशन) हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘Yellow alert’ in six districts of the state including Nashik

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

23 minutes ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

28 minutes ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

33 minutes ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

41 minutes ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

53 minutes ago

महिला अत्याचारांवर ‘झीरो टॉलरन्स’साठी आज बैठक

नाशिक : प्रतिनिधी शहरात अलीकडे घडलेल्या विविध घटनांमधून महिलांचे लैंगिक शोषण तसेच धर्मांतरणासारख्या प्रकारांचा पर्दाफाश…

1 hour ago