पोलिसांनी अडवल्यामुळे निवेदन न देताच परतले मोर्चेकरी
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील घरकामगार महिलांच्या हक्कांसाठी आयटकच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेतर्फे दि. 7 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी अडवल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येऊ शकला नाही. निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जात असताना पोलिसांनी आंदोलकांशी उद्धट वर्तन केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या वर्तनाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात न आल्याने पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, कामगार उपायुक्त विकास माळी यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी संघटनेच्या मागण्या राज्य सरकारकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, घरकामगार मंडळ स्थापन होऊन अनेक वर्षे झाली. मात्र, योजना अद्याप कागदावरच आहेत. शासनाने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभरातील घरकामगार महिला रस्त्यावर उतरतील.
या मोर्चामुळे नाशिक शहरात घरकामगार महिलांच्या हक्कांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आहे. संघटनेने मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. गोल्फ क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात हजारो घरकामगार महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आमच्या श्रमांना मान्यता द्या, घरकामगारांनाही हक्क हवा, अशा घोषणा देत महिलांनी शासनाकडे आपला रोष व्यक्त केला. मोर्चाचे नेतृत्व आयटक व राष्ट्रीय सरचिटणीस बबली रावत, राजू देसले, मीना आढाव, प्राजक्ता कापडणे, व्ही. डी. धनवटे, एस. आर. खतीब, तल्हा शेख, डॉ. सिलकेजा अहिरे आदींनी केले.
या प्रमुख मागण्या
घरकामगार महिलांच्या 13 प्रमुख मागण्या सादर करण्यात आल्या. घरकामगार मंडळाच्या सर्व योजना तातडीने कार्यान्वित करणे, बांधकाम कामगार मंडळाच्या योजनांचा लाभ घरकामगारांनाही देणे, सामाजिक सुरक्षा, पेन्शन, आरोग्यविमा व शिष्यवृत्ती योजना सुरू करणे, ‘माझी लाडकी बहीण’ योजनेंंतर्गत दरमहा 2100 रुपये आर्थिक सहाय्य देणे, घरकुल योजना व सणासुदीला ‘भाऊबीज भेट’ योजना सुरू करणे, घरकामगारांसाठी आठवड्याला एक पगारी सुट्टी देणे, कल्याण मंडळासाठी शंभर कोटींचा निधी उपलब्ध करणे, नोंदणीची वयोमर्यादा 65 वर्षांपर्यंत वाढवणे.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…