त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
येथील भरवस्तीत घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि 70 हजारांची रोकड चोरून नेली. माजी नगराध्यक्ष योगेश तुंगार यांच्या राहत्या घरी चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
योगेश तुंगार सध्या वास्तव्यास दुसरीकडे होते. त्यांच्या मूळ घरी ही चोरी झाली. दि. 3 ऑक्टोबरपासून या घरात ते आले नव्हते. बुधवारी (दि. 8) सकाळी ते घरी आले असता, बाहेरचा जाळीचा लोखंडी दरवाजा नेहमीप्रमाणे लोटलेला व कडी लावलेला होता. मात्र, आतील मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला व कुलूप लावलेला होता. दरवाजा उघडून आत गेले असता घरातील सर्व कपाटांची उलथापालथ केलेली होती. चोरी करताना केवळ सोन्याचे दागिने व रोकड पळवून नेली आहे. मात्र, त्याच वेळेस पाकिटातील विदेशी चलनाची नोट बाहेर काढून ठेवली होती. चांदीचे भांडे बाहेर काढून ठेवले होते. तसेच बंद पडलेल्या पाच रुपये चलनी नोटांचे बंडलदेखील सोडून दिले आहे. कपाटातील चिल्लर असलेली पिशवी नेलेली नाही.
या चोरीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी कर्मचार्यांसह भेट दिली. मध्यरात्री पाऊस झाला असल्याने श्वानपथक बोलावले नाही. मात्र, ठसेतज्ज्ञ पथकास पाचारण करण्यात आले आहे. ठसेतज्ज्ञ नमुने घेऊन गेल्यानंतर सोने खरेदीच्या पावत्यांच्या आधारे तक्रार नोंद करण्यात येणार आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…