सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट.

* पाहा व्हीडिओ

**अन्नदाता हाच देशाचा भाग्यविधाता* स्लोगन मधून दिला शेतकरी सन्मानाचा संदेश*

ग्रामीण भागातील तरुण कलाकारांना दिली संधी.*

अकरा एकरात देशातील पहिले भव्य फार्म आर्ट*

नाशिक सिन्नर शिर्डी रोडवरती MIDC परिसरात तयार झाले फार्म आर्ट.

सिन्नर: प्रतिनिधी

. राज्याचे उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदार संघात तब्बल अकरा एकर माळरानावर अजित दादांच्या फोटोचे फार्म आर्ट तयार करण्यात आले आहे. देशातील राजकीय व्यक्तिमत्वा चे साकारण्यात आलेले हे पहिलेच भव्य फार्म आर्ट आहे. ज्याची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठीची सर्व प्रकिया पूर्ण झाली आहेकलाकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून या फार्म आर्ट चे प्रयोजन आहे. सदर कला ही सावली  इव्हेन्ट च्या क्षिप्रा मानकर यांच्या मार्गदर्शनात सुप्रसिद्ध कलाकार मंगेश निपाणीकर यांचे सोबत सह कलाकार वैभव गुंड, शुभम गुंड, प्रशांत गुंड, ,सुमित मोरे, समाधान गुंड,सचिन गुंड, आप्पा शेंडगे यांनी अवघ्या सहा दिवसात ८ कलाकार आणि दोन ट्रॅक्टर यांच्या सहाय्याने तब्बल दहा तास काम करून हे भव्य आर्ट साकारले आहे. या संपूर्ण आर्टची ड्रोन शूटिंग राज्यातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार शिवराज मोरे यांच्या चमूने घेतले आहे. अन्नदाता हाच देशाचा भाग्यविधाता* हा संदेश देणारे हे फार्म आर्ट आणि ग्रामीण तरुण कलाकारांना दिलेल्या या संधीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

9 hours ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

15 hours ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

15 hours ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

1 day ago

ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर

ऑनलाइन  गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर:  साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…

3 days ago

नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला

नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला जखमी नांदगाव: प्रतिनिधी -…

4 days ago