राजकारणात नवा ट्विस्ट
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर अजित पवार यांच्यासह9 मंत्री सरकारमध्ये सहभागी झाले असतानाच आज राजकारणात नवा ट्विस्ट आला, राष्ट्रवादी चे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला वाय बी चव्हाण सेन्टर मध्ये गेले,
पंधरच दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह9 जणांना मंत्री करण्यात आले, त्यानंतर खाते वाटप झाले, उद्या पासून विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे, त्यात आज सगळे मंत्री शरद पवार यांच्या भेट घेण्यासाठी गेल्याने राजकीय मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते शरद पवार यांना भेटायला गेले. विशेष म्हणजे दोन्ही गटाचे नेते एकमेकांना पाण्यात पाहत असताना या घडामोडी मुळेनेमके काय राजकारण शिजतेय याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…