नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
एका युवकाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले, तिला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिचे न्यूड फोटो नातेवाइकांना पाठवण्याची धमकी देऊन तिच्याकडून 12 लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, हा छळ 2019 पासून आतापर्यंत सतत सुरू होता. जेव्हा हा प्रकार सुरू झाला तेव्हा पीडिता अल्पवयीन होती.
आरोपी महेंद्र संपत पोरजे याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवले. आरोपीने पीडितेला घाबरवण्यासाठी तिचे न्यूड फोटो काढले आणि ते तिच्या नातेवाइकांना पाठवण्याची धमकी देऊ लागला. नंतर आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी पीडितेवर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पीडितेचे न्यूड फोटो तिच्या कुटुंबीयांना दाखवण्याची आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्याची धमकी दिली. आरोपीने आतापर्यंत सुमारे 12 लाख रुपयेदेखील उकळले. अखेर धीर एकवटून पीडितेने उपनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरीक्षक वायकर या करीत आहेत.
Allegation of extorting ₹12 lakh from a minor girl by luring her with marriage and issuing threats.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…