नाशिक

अवघ्या 72 तासांत लावला हत्येचा छडा

सुटकेसमध्ये फेकून दिलेल्या महिलेच्या हत्येचा तपास लावण्यात आडगाव पोलिसांना यश

पंचवटी : प्रतिनिधी
एका महिलेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून तपोवनातील केवडीबन भागातील गो सेवा ट्रस्टजवळ फेकून दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. या मृत महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, आडगाव आणि उपनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या कौशल्याने तपास करत अवघ्या 72 तासांत या थरारक हत्याकांडाचा छडा लावला आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी संशयित आरोपीला थेट कर्नाटकच्या मंगळूरमधून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव सुनेत्रा विश्वकर्मा (वय 30) असे असून, संशयित आरोपी गोपी गोसावी (वय 35) याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. दोघेही उपनगर परिसरामध्ये भाड्याने खोली घेऊन एकत्र राहत होते. शनिवार, 13 जून रोजी रात्री गोपी हा दारूच्या नशेत घरी आला. यावेळी दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, गोपीने रागाच्या भरात कपड्याने तोंड दाबून सुनेत्राची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला आणि तपोवनातील निर्जन स्थळी फेकून दिला.
महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान होते. तपासादरम्यान सुनेत्राच्या बहिणीने मृतदेहाची ओळख पटवली. विश्वकर्मा कुटुंब हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून, गेल्या 20 वर्षांपासून रोजगारासाठी नाशिकमध्ये स्थायिक झाले आहे.
गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी आडगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित गोपीच्या भावाचा माग काढला. गोपीच्या भ्रमणध्वनीचा माग घेतला असता, तो मुंबईमार्गे रेल्वेने कर्नाटकला पळाल्याची माहिती मिळाली.

त्रिकोणी प्रेम अन् संशयाचा खेळ

संशयित आरोपी गोपी गोसावी हा व्यवसायाने प्लंबर आहे. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याने मंगळूर येथील दुसर्‍या महिलेशी विवाह केला होता. त्याची दुसरी पत्नी सध्या गर्भवती आहे. याच दरम्यान त्याचे घटस्फोटीत असलेल्या सुनेत्रासोबत प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, संशयाच्या भूतामुळे या प्रेमसंबंधांचा थरारक शेवट झाला.

Murder case solved in just 72 hours.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago