सिन्नरला महावितरणविरोधात तक्रार; जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी
सिन्नर : प्रतिनिधी
शहरातील राजा फत्तेसिंग रोड परिसरात ग्राहकाची कोणतीही पूर्वपरवानगी किंवा लेखी संमती न घेता जबरदस्तीने प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी व्यावसायिक अकील अब्बास शेख यांनी महावितरण प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत पूर्वीचे डिजिटल मीटर पुन्हा बसवण्याची मागणी केली आहे.
शेख यांच्या दुकानात 26 मे रोजी सकाळच्या सुमारास महावितरणचे वायरमन आणि स्मार्ट मीटर बसविणार्या ठेकेदाराच्या कर्मचार्यांनी भेट देत कोणतीही पूर्वसूचना न देता जुने डिजिटल मीटर काढून नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मीटर बदलण्यापूर्वी कोणतीही नोटीस, एसएमएस, लेखी आदेश किंवा अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याने ही कारवाई बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तक्रारीत विद्युत कायदा 2003 मधील विविध तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्राहकाला कार्यरत व अचूक मीटर मिळण्याचा अधिकार असल्याचे नमूद करत, सुरू असलेले डिजिटल मीटर बदलण्याची आवश्यकता नव्हती, असा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रीपेड प्रणाली स्वीकारायची की नाही, हा निर्णय ग्राहकाचा असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, संबंधित ग्राहकाने महावितरण प्रशासनाकडे जुने डिजिटल मीटर तत्काळ पुन्हा बसवावे, संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच मीटर बदलण्याबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. तक्रारीसोबत वीज बिलाची प्रत आणि नवीन स्मार्ट मीटरचे छायाचित्रही जोडण्यात आले आहे.
दोन्ही मीटर रेफरन्ससाठी ठेवणार
स्मार्ट मीटर ही काळाची गरज आहे. सर्व ग्राहकांकडे टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. स्मार्ट मीटर आणि जुन्या मीटरमधील रीडिंग किंवा देयकात तफावत आढळल्यास दोन्ही मीटर रेफरन्स म्हणून ठेवण्यात येतील, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोडे यांनी दिली.
Allegation of installing smart meters without customer’s permission
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…