देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील लष्करी छावणी असलेल्या देवळालीत काल मध्यरात्री संशयास्पद सुटकेस बॅग आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लष्करी रुग्णालयाच्या लगत, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाजवळ आणि खंडेराव महाराज टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही बॅग आढळली.
शिंगवे बहुला येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मोजाड हे घरी जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला संशयास्पद बॅग दिसली. त्यांनी तात्काळ देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शहानिशा करून बॅग उघडली असता, सुदैवाने कोणतेही घातक साहित्य त्यात आढळले नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या तपासणीदरम्यान महिला पोलिस हवालदार बबिता म्हस्दे, करवंदे आदी उपस्थित होते. तर प्रत्यक्षदर्शी प्रमोद मोजाड यांच्यासोबत रवींद्र गायकवाड व प्रशांत गांगुर्डे यांनी ही पाहणी केली. याआधीही देवळाली रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर स्टेशन परिसरात संशयास्पद बॅग आढळून आली होती. त्यावेळीही श्वानपथक व बीडीडीएस टीमने तपासणी करून घातक काही आढळले नव्हते.
देवळाली कॅम्प शहरातील बहुतांश भाग हा लष्करी असल्याने हा संवेदनशील परिसर आहे. नागरिकांनी जागरूक राहावे. कुठेही संशयास्पद वस्तू किंवा बेवारस सामान दिसल्यास दुर्लक्ष न करता तात्काळ पोलिसांना कळवावे.-श्रीनिवास देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवळाली कॅम्प
लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…
ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…
नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…
कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…
पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…
अन्यथा अधिकार्यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…