नाशिक ः प्रतिनिधी
घोटी (ता. इगतपुरी) येथील रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत तीन वर्षीय मनोज हा बालक 16 मे रोजी बेवारस स्थितीत सापडला. त्याला बालकल्याण समितीच्या आदेशाने आधाराश्रम, नाशिक या संस्थेत दाखल करण्यात आले आहे.
पालक किंवा त्याच्या नातेवाइकांनी बालकाची ओळख पटवून पुढील 30 दिवसांच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नाशिक कार्यालयाने केले आहे.
ओळख पटविण्यासाठी येथे संपर्क साधा
आधाराश्रम, नाशिक : फो. नं. (0253) 2580309/2950309
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नाशिक
(जिल्हा बाल संरक्षण कक्ष, समाजकल्याण आवार, नासर्डी पुलाजवळ, नाशिक- पुणे रोड, नाशिक)
फोन- (0253)2236368
बालकाची ओळख पटवून तीस दिवसांच्या आत महिला बालविकास विभाग किंवा आधाराश्रमाशी संपर्क करावा. कोणी दावेदार समोर न आल्यास, मनोज हा पालकत्वाविना असल्यास, तसे गृहीत धरून त्याच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येईल,
– सुनील दुसाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,नाशिक
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…