नाशिक

छत्रीची ढाल, जिगरबाज 70 वर्षांचे आजोबा!

चिंचखेड्यात बिबट्याला धाडसाने पळवले

दिंडोरी : प्रतिनिधी
धैर्य, प्रसंगावधान आणि अफाट आत्मविश्वास असेल तर मोठ्या संकटावरही मात करता येते, याचा जिवंत प्रत्यय दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे आला. हातात केवळ छत्री असताना समोर आलेल्या बिबट्याला न घाबरता, 70 वर्षीय भास्कर बाबूराव पवार यांनी छत्रीची ढाल करत बिबट्याला पळवून लावले. या थरारक घटनेचे परिसरात कौतुक होत आहे.
चिंचखेड-जोपूळ रस्त्यावरील गट क्रमांक 624 मध्ये भास्कर पवार यांची शेती व घर आहे. घरामागे उसाचे दाट पीक आहे. रिमझिम पावसात हातात छत्री घेऊन ते शेताच्या पाहणीसाठी निघाले होते. उसाच्या शेतालगत जात असताना अचानक बिबट्या बाहेर आला आणि त्यांच्यासमोर उभा ठाकला. या भयानक प्रसंगात भास्कर पवार यांनी धीर सोडला नाही. त्यांनी हातातील छत्रीची वारंवार उघडझाप करून स्वतःचा आकार दिसण्याचा प्रयत्न केला अन् मोठमोठ्याने आरडाओरड केली. त्यांच्या या अनपेक्षित व आक्रमक प्रतिकारामुळे बिबट्या गोंधळून गेला आणि हल्ला न करता पुन्हा उसाच्या शेतात पळून गेला. घटनेनंतर चिंचखेड विकास सोसायटीचे उपाध्यक्ष माधव पवार यांनी वन विभागाशी संपर्क साधला. वन्यजीव रक्षक जीवन साताळे, प्रवीण शिंदे, दिनकर बोंबले, निवृत्ती संधान व चंद्रभान संधान यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला.

आजोबांच्या धाडसाचे कौतुक

कोणतीही गोष्ट अशक्य नसून, प्रसंगावधान राखल्यास संकटावर मात करता येते, असे उक्तीप्रमाणे सिद्ध करत 70 वर्षांच्या जिगरबाज आजोबांनी बिबट्याला पळवून लावून स्वतःचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

An umbrella as a shield—a gutsy 70-year-old grandfather!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार…

- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…

15 hours ago

मोबाईलमुळे भविष्य संकटात

- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…

15 hours ago

नाठाळांच्या माथी हाणा काठी!

- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…

15 hours ago

ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरूपी पर्यटकांचा ओघ वाढावा

- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…

16 hours ago

खड्ड्यांचे पाप कोणाचे?

- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…

16 hours ago

ऊर्जेची बचत, यशाची गुरुकिल्ली!

- जगन घाणेकर  वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…

16 hours ago