लासलगाव पोलिसांचा छापा; 88.36 लाखांचा मुद्देमाल जप्त
विंचूर : वार्ताहर
निफाड तालुक्यातील विष्णूनगर येथे लासलगाव पोलिसांनी युरिया खताचा काळाबाजार करणार्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. छापा टाकून पोलिसांनी 88 लाख 36 हजार 624 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, खत नियंत्रण आदेश आणि भारतीय न्याय संहिता-2023 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पंचायत समिती निफाडचे खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी संदीप मोगल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर दगू पवार (वय 37, रा. इंदिरानगर, विंचूर), सागर किशोर गरड (वय 27, रा. सुभाषनगर रोड, विंचूर) या दोघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही धडक कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. व्ही. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंके
करत आहेत.
अशी झाली कारवाई
शनिवारी (दि. 1) दुपारी अडीचच्या सुमारास विष्णूनगर येथील हॉटेल न्यू क्रांतीच्या पाठीमागील कांद्याच्या चाळीत (खळ्यात) हा छापा टाकला. तपासादरम्यान संशयितांनी संगनमत करून शेतकर्यांसाठीचा अनुदानित युरिया स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विकण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले.
जप्त केलेला मुद्देमाल
अनुदानित युरिया- 264 गोण्या.
टेक्निकल ग्रेड युरिया (औद्योगिक वापर) – 464 गोण्या.
वाहने- 1 आयशर टेम्पो व 1 टाटा ट्रक.
इतर साहित्य – 3 मोबाइल फोन, रिकाम्या गोण्या आणि गोण्या शिवण्याचे मशीन.
एकूण ऐवज- रु. 88,36,624/-
Urea black marketing racket busted near Vishnunagar.
- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…
- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…
- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…
- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…
- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…
- जगन घाणेकर वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…