महाराष्ट्र

अंधेरी पोटनिवडणुकीत मशाल पेटली , ऋतुजा लटके विजयी

अंधेरी पोटनिवडणुकीत मशाल पेटली
ऋतुजा लटके विजयी

मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या अंधेरी(andheri) विधानसभा मतदार संघ निवडणुकीत अखेर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय संपादन केला, ऋतुजा लटके यांना 65335 मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकाची 12691 मते ही नोटाला पडली, भारतीय जनता पक्षाने येथे मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती, परंतु राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहन नंतर त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली होती, त्यामुळे लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता, तथापि नोटला मतदान करा असा प्रचार भारतीय जनता पक्षाच्या वतीने केला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे,
, आज सकाळ पासून मतमोजणीला सुरवात झाली, येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके रिंगणात असून त्यांच्या विरोधात भाजप, शिंदे गटाने उमेदवार दिलेला नव्हता,, एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत मतांचा टक्का घसरला होता, येथे नोटांचा वापर करण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती,
सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्या नंतर पहिल्या फेरीपासून ऋतुजा लटके आघाडीवर होत्या,, पहिल्या फेरीत त्यांना 4277 मते मिळाली, त्याखालोखाल नोटा ला 622 मते मिळाली, दुसऱ्या फेरीत 7817 तर नोटला 1470 मते मिळाली, तिसऱ्या फेरीत 11,368 तर चौथ्या फेरीत 14 हजाराहून अधिक मते मिळाली, होती, ही आघडी पुढे वाढत गेली, 15 व्या फेरीनंतर लटके यांना 66335 मते मिळाली,

नोटा दुसऱ्या क्रमांकावर
अंधेरी निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर नोटा राहिल्यामुळे हा भाजप चा डाव असल्याची टीका होत आहे,

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago