लासलगाव : वार्ताहर
लासलगाव – टाकळी बायपास रोडवर अंबिका हॉटेलजवळ रविवारी (दि. 21) दुपारी टाटा कंटेनर व दुचाकी अपघातात पस्तीस वर्षीय अंगणवाडी कायर्र्कर्ती ठार झाली, तर दुचाकीचालक युवक गंभीर जखमी झाला.
सविस्तर माहिती अशी की रविवारी दुपारी 1.25 च्या
सुमारास टाटा कंटेनर (एमएच 46 सीएल 4030) व बजाज प्लॅटिना मोटारसायकल (एमएच 15 ईएम 1912) यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीचालक तुषार भाऊसाहेब पानगव्हाणे गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुचाकीवर मागे बसलेली महिला गंगा ऊर्फ गायत्री हेमंत घायाळ (वय 35, रा. पाबळवाडी, ता. निफाड) हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर पवार तपास करीत आहेत.
Anganwadi worker killed in container-bike collision सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…